गझलेची या हडळ जाहली हझल वाचवायला
मध्यरात्र होताच जाय ती रान कोळपायला
आमटी भाकरी खाऊन पोरगं जाय साळंला
मायंदाळ शिकलं मोठं झालं म्यागी पचवायला
खारट कडवट पचवून हसतो सदासर्वदा तो
पचलं नै वाटतं म्हणतं कोणी त्याला खिजवायला
कुळवाडीण शेतात राबते खांब घराचा ती
अंगण झाडुन लगबग जाते शेत भांगलायला
फिरुन डोंगरी करवंदाच्या पाट्या भरुनभरून
मैना जाते बाजाराला खुर्दा मिळवायला
गझल मात्रावृत्त (मात्रा २७)