हळूहळू हे वाजत आहे पानगळीतिल पान
वृक्षातळीच्या पाचोळ्याला ऐकू देऊन कान
पाचोळ्यातुन ऐकायाला किलबिल किलबिल गान
रवीकिरणांचे भू वर आले अगणित सरसर बाण
शीळ घालतो सुरभित वारा हरपुन तन मन भान
लहर लहरती लता माधवी वेळावीत ग मान
जरी छाटली खोडे त्यावर फुटली पर्णे सान
पुनव रात्रीला शिशिर नेतसे चंद्रावरती यान
उधळुन देती ऋतू सहाही कू वर अपुली जान
भू – भूमी
कू – पृथ्वी