सांग गझला कशाने लिहू मी
हात मिटला कशाने लिहू मी
धारना राहिली लेखणीला
टाक पिचला कशाने लिहू मी
प्राशुनी नीर सारे नदीचे
पेन फुटला कशाने लिहू मी
पेलता दो करी जड धनूला
बाण सुटला कशाने लिहू मी
नाव मेंदीतले रेख म्हणशी
कोन तुटला कशाने लिहू मी
वृत्त – भामिनी
लगावली – गा ल गा/गा ल गा/ गा ल गा गा