एक ओळ मज सुचते जेंव्हा लिहावयाला काही
भातुकलीतिल पितळी भांडी का घासू मी बाई
टाळेबंदीच्या डावातिल डाव पळ्या अन काटे
घासायाला भांडेवाली नकोच म्हणते वाटे
मीठ चिंच वा लिंबू फोडी नको घालवू वाया
पितांबरीने लख्ख उजळते तांबे पितळी काया
किणकिणणारी सान क्रोकरी चहा म्हणूनी पाणी
तरंग उठता हलके हलके अधरी बडबडगाणी