बुडत्याला आधार कडीचा खरेच आहे
मला वाटते जुने लिहावे बरेच आहे
स्वभाव अपुला आपण जपतो असेच आहे
आत्मा म्हणतो जे आहे ते तुझेच आहे
श्वान भुंकतो कारण त्याचे तेच बोलणे
रोज भुंकणे जरी तेच ते नवेच आहे
बाळ बोबडे बोले काही खिदळत नाचत
कौतुक करण्या म्हणते आई खुळेच आहे
क्षेत्र आपुले जपण्यासाठी धडपड असते
तिला कळाले सारे सुंदर तिचेच आहे
मात्रावृत्त (८+८+८=२४ मात्रा)