गझल कामठ्यात तीर एक लावतोय आज
भेदण्यास लक्ष्य वीर एक ठाकतोय आज
एक दोन तीन चार आत्मरूप जाहलेत
उधळण्या फुले अबीर एक पाततोय आज
ध्यास त्यांस गझलचाच मुक्त तिज करावयास
तळपत्या उन्हात पीर एक तापतोय आज
चौकटीत ठाकठोक करुन मूर्त बसवलीय
चौकटीस त्या जुनाट मीर पाडतोय आज
घाट वळणदार गर्द भोवती कडे विशाल
गाठण्यास शिखर टोक धीर धावतोय आज
गझल – अक्षरगण वृत्त (मात्रा २४)
लगावली – गालगाल/गालगाल/गालगाल/गालगाल/