रथास अश्व सात जोडलेत
तयात सूर्यदेव बैसलेत
समुद्र कुंचल्यास फिरवतोय
निळ्या नभास स्वर्ण वर्ण देत
उधाणलेय नीर तप्त लाट
नमेन त्यास ओंजळीत घेत
निसर्ग धुंद रंग उधळतोय
सुगंध लहर दौडते हवेत
निवांत ऐक गीत गझल गाज
प्रसन्न ऊन्ह कोवळे नि रेत
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १६)
लगावली – लगाल/गाल/गाल/गाल/गाल/