सांज व्हावी मोरपंखी रात यावी गात गाणे
रामप्रहरी वारियाने जाग यावी गात गाणे
वेदनांचा अंत व्हावा प्रेम या जगती फुलावे
मूक झालेल्या विजेची साद यावी गात गाणे
चंद्र तारे सूर्यसुद्धा डोकवावा अंतरी मम
मी असावे स्वच्छ ऐना प्रीत यावी गात गाणे
मी जशी आहे तशी मी वागते अन बोलतेही
सांगण्या हे वादळाची हाक यावी गात गाणे
नाव नेत्रा वा सुनेत्रा… दे कुनेत्रा तू मला गे
न्यावया मज एक सुंदर नाव यावी गात गाणे
गझल – मात्रा २८
लगावली – गालगागा/ ४ वेळा हाक प्रीत