जलौघवेगा धबाबणारी धरेवरी या
जलौघवेगा नभास भारी धरेवरी या
मिळावयाला जिवास मुक्ती जळी समुद्री
जलौघवेगा करेल वारी धरेवरी या
खळाळणाऱ्या रुपात सुंदर सदैव वाहे
जलौघवेगा सुडौल नारी धरेवरी या
झळाळणाऱ्या तळ्यात कमळे फुलावयाला
जलौघवेगा गुलाबझारी धरेवरी या
विडे बनविण्या लवंग खुपसुन खरी सुकन्या
जलौघवेगा कुटे सुपारी धरेवरी या
गझल- अक्षरगण वृत्त (मात्रा २४)
लगावली – लगालगागा/ ३ वेळा