काल मी लिहिलेच नाही वासरीत काही
विसरले करण्यास नोंदी डायरीत काही
पसरले कडधान्य देण्या ऊन छान वारा
पाखरे आलीत टिपण्या ओसरीत काही
कोसळे पाऊस धो धो अंगणात दोरी
घातले सुकण्यास कपडे गॅलरीत काही
आज मी गाऊन भरते ओंजळीत गाणे
शोधुनी हुंकार अडले पावरीत काही
माझिया ओठात येता बहर गालगागा
कागदावर उतर गझले सावरीत काही