मुस्तज़ाद गझल
कधीच नाही जरी घेतली घेऊ थोडी
भरून प्याले तरी झेपली घेऊ थोडी
दिल्यास तू ज्या जखमा मृगजळ करिती खळखळ
नाद ऐकुनी नशा पेटली घेऊ थोडी
करावयाला जशी साठवण तुझी आठवण
दिव्यात भरता वात तेवली घेऊ थोडी
पैशांची या मिटण्या चणचण केली वणवण
थकल्यावरती पाठ टेकली घेऊ थोडी
उपवासाने गळून गेली पूजा केली
करुन पारणे आज जेवली घेऊ थोडी
मुस्तज़ाद ग़ज़ल
अधिक माहिती -मजल दरमजल… माझी ग़ज़ल! पृष्ठ क्र. बारा, तेरा
ग़ज़ल संग्रह – मोगरा, ग़ज़लकार – इलाही जमादार