माधव केशव वा गोविंदा
नगर पुरीचा तो तर बंदा
स्टार्टर लावायाच्या आधी
सुरू जाहला अवैध धंदा
वाटत वाटत डाळ चण्याची
तुटले बंधन चारुन कुंदा
बोल लावला खोटा बाबा
गळी पडूनी झाला फंदा
करून उष्टा उरला सुरला
बाटलीत ती भरते चुंदा
उद्योगाची वाट लावुनी
कोठडीत उद्योगी मंदा
भूमातेचे स्वत्त्व जपाया
चंद्र देतसे अभय नि चंदा
गझल मात्रावृत्त (मात्रा १६)