गझल लिहेन तुझ्यासाठी
कमळ बनेन तुझ्यासाठी
जलद रडेल खरेखोटे
ख कोसळेन तुझ्यासाठी
अशीच मस्त धुवांधार ग
पडत जगेन तुझ्यासाठी
कडवट कोळ मिठाईला
विरघळवेन तुझ्यासाठी
तिखट मधुर चकल्या पाळे
कडक तळेन तुझ्यासाठी
चल ललने फिरु बाजारी
गुण उधळेन तुझ्यासाठी
जरी सरळ तरल ‘सुनेत्रा’
कुरुप दिसेन तुझ्यासाठी
गझल – १४ मात्रा
लगावली – लगा/लगाल/लगागागा/