चुकते अपुले – CHUKATE APULE


चुकते अपुले… शिकवण्या जादुई काही
बघ वेळ अजुनही …गेली नाही काही
जो विरह सुगंधी … करून तुजला गेला
तव हाक ऐकुनी … वाटेवर बघ अडला

भरता भरता बुडते घागर ,,,भरून वरती येते
तरंगते पाण्यावर हलके … तरून वरती येते
निवांत जीवनगाणे आता… गाण्यासाठी जगते
एक एक क्षण जगून घयावा … जगण्यासाठी तरते

कागदी नाव ही पाण्यावरती तरते
तरता तरता हाच दिलासा देते
आयुष्य जगावे लहरत लहरत गावे
अन आपण अपुले स्वतः लिहावे गाणे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.