तरही गझल
गझलेची पहिली ओळ गझलकार इलाही जमादार यांची
तसा कुणाच्या चौकटीत तो बसला नाही
तरी कुणाला अंगणातही दिसला नाही
फुलाफुलांची अंगणातली रांगोळी ही
तिला जपाया पावसातही फसला नाही
हवेहवेसे रंग फासुनी भिजवुन मजला
कधीच माझ्या चौकटीत तो घुसला नाही
जरी नव्याने चौकटीतल्या विश्वी रमले
तरी कधीही मूक होऊनी रुसला नाही
कसे हसावे हेच शिकविले त्याने मजला
रडावयाला लावुनी मज तो डसला नाही
खरे खरे मी खूप बोलले खोटे नाही
म्हणून जाणे सत्य हेच तो तसला नाही
जरी सुनेत्रा लाख बोलली जा तू जा तू
तसा गुरू पण अन्य अंतरी ठसला नाही
गझल – अक्षरगण वृत्त मात्रा २४