कळ्या गुलाबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या
कळ्या नवाबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या
भाव सांडती नेणिवेतील जाणिवेतील
कळ्या शराबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या
सुरभित करिती परिसर पावन रंगबिरंगी
कळ्या शबाबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या
हजर जाहल्या हजरजबाबी बोल उधळण्या
कळ्या जबाबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या
कानामध्ये सांगतिल मज कशी बोचली
कळ्या खराबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या
स्थावर जंगम असल्या क्षुल्लक धरून बसती
कळ्या न बाबी शुभ्र केशरी लाल जांभळ्या
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)
सारवान – कळया
काफ़िये – बाबी, खराबी, जबाबी, शबाबी, शराबी, नवाबी, गुलाबी
रदीफ – शुभ्र केशरी लाल जांभळ्या