ब्रम्हकमळ मम हृदयी फुलण्या शुद्ध शुद्ध हो तू
भूमीमध्ये सत्य पेरण्या शुद्ध शुद्ध हो तू
पर्युषणातिल दशधर्मांची शिडी चढायाला
जिनधर्माची मेढ रोवण्या शुद्ध शुद्ध हो तू
नकोस भटकू अंधारी या लाव दीप आता
अंतर्यामी दिवा उजळण्या शुद्ध शुद्ध हो तू
साक्षीभावानेच पहावे कर्मकांड सारे
कांडामधले मिथ्य जाणण्या शुद्ध शुद्ध हो तू
शशांक मधुरा यांच्यासाठी जिती सुनेत्रा ही
मनात दडला काम जाळण्या शुद्ध शुद्ध हो तू
गझल मात्रावृत्त – २६ मात्रा