जिनदेवांची वाट पाहते आत्मधर्मी राधा
जिनदेवांची गोष्ट सांगते आत्मधर्मी राधा
सत्य जाणण्या जन्मजन्मिचे दर्पण तोडुनीया
जिनदेवांची भेट मागते आत्मधर्मी राधा
काष्ठाच्या मंचकावरी घन पूजन करावयास
जिनदेवांची मूर्त मांडते आत्मधर्मी राधा
भल्या पहाटे शुद्ध घृताच्या दिव्यात तेजोमयी
जिनदेवांची भक्त भासते आत्मधर्मी राधा
जिनदेवाच्या भक्तीमध्ये चिंब चिंब न्हाउनी
जिनदेवांची प्रीत वाचते आत्मधर्मी राधा
गझल मात्रावृत्त (मात्रा २७)