कोण हा झरतृष्ट आहे
पुस्तकाचे पृष्ठ आहे
कोण लिहितो गीत यावर
दृष्ट की अदृष्ट आहे
…
मेघ घन घन कृष्ण आहे
जलद भरला तृप्त आहे
सांडण्या धो धो सुखाने
जाहला संपृक्त आहे
…
वाफ भरली लुप्त झाली
मेघना संतुष्ट झाली
गार वारा झोंबल्यावर
कोसळूनी मुक्त झाली
…
रुष्ट होणे बरे नाही
गुप्त होणे बरे नाही
गोठले मन जरी इतुके
क्षुब्ध होणे बरे नाही
…
अता पावसा ये मला मोल देण्या
कुशल सांग सारे तुला मोल देण्या
कसे दान द्यावे कशी झेप घ्यावी
शिकावीच उत्तम कला मोल देण्या