ऊन सावली हिरवाळीवर लोळत आहे
रम्य हवेलीच्या छपरावर नाचत आहे
वळणा वळणाच्या वाटेवर वळसे घेण्या
झुकझुकणारी ट्राम विजेवर धावत आहे
वृक्ष तरूंच्या पानांवरती झाक पोपटी
तिथे तरुतळी मुग्ध बालिका खेळत आहे
मधुर सुवासिक दरवळणारा आंबेमोहर
आंबेराई कंच पाचुसम डोलत आहे
धूत धवल पाकळ्या जुईच्या त्यावर मोहक
कुशल सुनेत्रा कशिदा नाजुक रेखत आहे