कुरणांवरती मेंढ्या फिरती ओढ्याकाठी
गळ्यातल्या घंटा किणकिणती ओढ्याकाठी
निळ्या पर्वती प्रभा पसरली उजळत माथे
इवले इवले ठिपके चरती ओढ्याकाठी
कुठे बैसला मेंढपाळ वाजवीत पावा
मऊ घोंगडे खांद्यावरती ओढ्याकाठी
गवतावर फुलपाखरे जांभळ्या पंखांची
पंख झुलवुनी मजेत उडती ओढ्याकाठी
खळाळते जल त्या तालावर वारा गाई
काठावर मासोळ्या दिसती ओढ्याकाठी
गझल मात्रावृत्त – (मात्रा २४)