काय बोलू काय पाहू मज कळेना
अंतरीचे चाललेले गुज कळेना
किलबिलाटातच पहाटे ऐकलेली
पाखरांची मधुर ती कुजबुज कळेना
कैक पूजा मांडल्या कल्याणिकांच्या
का तुला पण शब्द सुंदर भज कळेना
प्रवचने शास्त्रे पुराणे पाठ तुजला
प्रेममय भाषा गझलची तुज कळेना
घाम तो गाळून फुलवी द्राक्षबागा
फक्त त्याला ठिबकसिंचन निज कळेना
वृत्त – मंजुघोषा , मात्रा २१
लगावली – गा ल गा गा / गा ल गा गा / गा ल गा गा