ती मद्रासी सुबक ठेंगणी तो बंगाली बावरा
वय सोळाचा कवी मनाचा जरी बोलका लाजरा
काजळ नेत्री गजरा लागे रोज रोज मज साजणा
एरंडाचे झाड आणखी लावु अंगणी मोगरा
हातामध्ये चुडा चमकतो हसते बाला गोजिरी
हळद खेळुनी गझलेमधली किती उजळला चेहरा
जिन्यावरूनी डौलामध्ये चालत जाई सुंदरा
दुरून कोणी रसिक पाहती म्हणते त्यांना सावरा
काळ्या केसांचा अंबाडा त्यावर वेणी माळते
मूक गुरांना घालत चारा कुरवाळे ती वासरा
गझल लिहोनी तृप्त ‘सुनेत्रा’ आज खरोखर जाहली
भाऊ आहे शूर तिचा रे शिरोमणी अन साजरा