बास वाटते लिहून जाहलेय बोर बोर
काफिया पहा किती चकोर मोर चंद्रकोर
कमलिनी दलात शांत पहुडलेत चांदण्यात
भ्रमर भृंग हे नव्हेत नेत्र हे तुझे टपोर
वाट पाहणे पुरे कुणास रोखले न मी
परवडेल ना मला सदा तुझ्या जिवास घोर
टोक गाठले असे पुढे न वाट कळस घाट
घ्यायची अता उडीच कापलेत सर्व दोर
काय चोरले बरे कुठे कसे कुणा न थांग
तोच चोरटा परी म्हणेल बघ तुलाच चोर