पूर्ण भरता धरण आसवांचे
ऊन्ह करते हरण वासनांचे
अंबरी विहरता मेघमाला
रान वाटे जणू मोतियांचे
चुंबिता वात तो घन घनांना
वीज माळे तुरे तारकांचे
शीत धारांसवे धावताती
जलद हे भूवरी भावनांचे
तृप्त होता धरा जीवसृष्टी
पीक येई नवे चांदण्यांचे
वृत्त – भामिनी
लगावली – गा ल गा/गा ल गा/ गा ल गा गा