कशाला हेवेदावे करण्या भांडण तंटे
कशाला कपटी कावे करण्या भांडण तंटे
उशाशी धोंडा खाण्या कोंडा आवड ऐसी
कशाला कोणी यावे करण्या भांडण तंटे
शिव्यांचा मारा गुटका मावा यातच जगण्या
कशाला दारू प्यावे करण्या भांडण तंटे
मनाची शुद्धि आत्मानंदी आपण सैनिक
कशाला राजे व्हावे करण्या भांडण तंटे
सुनेत्रा नावे गझला लिहिते आनंदाने
कशाला कोणा खावे करण्या भांडण तंटे
गझल – मात्रा २५
लगावली- लगागा/गागागागा/गागा/गागा/गागा/