क्षमा धारणे मार्दव येते हृदय भिजविते
मन वचने कृति यात सरलता शौच प्रकटते
आत्ममंदिरी नाद अनाहत मधुर बरसण्या
अंतर्यामी शिवरुप सुंदर सत्य झळकते
धूप सुगंधी मम् कायेचा संयम धर्मी
तपोधुनीने यज्ञी जाळुन काम त्यागते
भाव आप पर संसाराची करता वृद्धी
त्यास त्यागुनी अकिंचन्य मी खरे जाणते
उरता सात्त्विक प्रेम न उरता देहासक्त्ती
ब्रह्मचर्य त्या निर्मल हृदयी पूर्ण उमलते
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)