मी तुझी आहेच नाविक दिव्य आत्म्या
मी सुवासिक पुष्प नाजुक दिव्य आत्म्या
सोनचाफा तू दिलेला आठवोनी
भावना झरतात साजुक दिव्य आत्म्या
नाद घंटेचा जिनांच्या मंदिरातिल
ऐकण्या मी मौन साधक दिव्य आत्म्या
ओतता माधुर्य मधुरा काव्य कुसुमी
मोगरा फ़ुलतोच सात्त्विक दिव्य आत्म्या
पौर्णिमेचा चंद्र शीतल किरण सांडी
ज्ञान खिरते शुद्ध तारक दिव्य आत्म्या
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २१)
लगावली – गालगागा/गालगागा/गालगागा/