आवडतो मज माझा पट्टा
आवळतो गज माझा पट्टा
ऐन्यामधल्या बिंबामधुनी
म्हणतो तू सज माझा पट्टा
पाण्यामध्ये पद्म फुलाया
कालवितो रज माझा पट्टा
रोज नको बस्तीला जाऊ
म्हणतो मज भज माझा पट्टा
धुंडत आहे गझल कागदी
कोरा कागज माझा पट्टा
गझल मात्रावृत्त (मात्रा १६)