आम्रतरुतळी बसून लिहुया पाऊसगाणी
आंबे कैऱ्या बघून लिहुया पाऊसगाणी
वनराईच्या तळ्यात डुंबू उडवीत पाणी
धरणीवरती पडून लिहुया पाऊसगाणी
वारा येता सुसाट धावत पडतील कैऱ्या
खात मजेने रमून लिहुया पाऊसगाणी
धो धो धो धो पडेल वेडा पाऊस नाचत
धारांमध्ये भिजून लिहुया पाऊसगाणी
बदके कमळे तळ्यात पोहत गातील गाणी
त्यांच्यासंगे सजून लिहुया पाऊसगाणी
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २५)
लगावली – गागागागा/लगालगागा/गागालगागा/