जीव प्रवासी पक्षी आहे
क्षितिजावरची नक्षी आहे
वाघ कसा रे शाकाहारी
तो तर प्राणीभक्षी आहे
मोजत बसणारा योनींना
गरगर फिरतो अक्षी आहे
मुक्ती कशाची मोहांधाला
बसून अपुल्या कक्षी आहे
सुनेत्रास या कधीच कळले
रत्नत्रय धन वक्षी आहे
मात्रावृत्त (१६ मात्रा)