फापटपसारा – FAAPAT PASARAA


कवीच्या जाण्याचे दुःख ..
कवी नावाच्या संवेदनशील हृदयाला होतच असते…
कारण… त्याच संवेदनशीलतेने…
त्यानेही टिपलेली असतात …
हळुवार मनाची स्पंदने……..
कधी हाताच्या बोटांची थरथर…
कधी पूर्ण अंगावर अचानक उठलेले शहारे ….
बोलत असतात….
त्याच्याच भाषेतून….
ती भाषा….
कुठल्याही पुस्तकात वाचून शिकता येत नाही….
त्या भाषेला व्याकरण नसतं … फक्त भाव असतो….
ते अनुभवत कवीचं हृदय घडत असतं ….
तिथं पाप नसतं …पुण्यपण नसतं …
असतो तो केवळ भावनेचा अनुवाद …
शब्द अपुरे पडतात…त्यांच्या अनुवादासाठी…. म्हणूनच तर…
ही टिम्ब टिम्ब ची भाषा …. पेरलेली असते …
ज्याने त्याने करावा अनुवाद या टिम्बटिम्बचा … आपापल्या
इच्छेनुसार….
……. ….. ….
कोणी देहबोलीवरून भाव ही जाणतात म्हणे…. !
आणि असा दावा करून ….मांडत जातात तेच…
अर्थाचा फापटपसारा …. ! !
अरे आधी शिकारे …स्वतःच मन हृदय भावना …..जाणायला…
मग कळाल …स्वतः स्वतःला…. आणि…
दुसऱ्याला
सुद्धा !…..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.