फूड – FOOD


चवदावे रत्न ….
सुबक ठेंगणी वय चवदाची
गझल देखणी सय चवदाची
रत्न रुबाई हे चवदावे
बाईपण मम मजला भावे

बटुव्याची खीर….
मी कणिक तिंबुनी गोळा केला बाई …
अन हात चोळले हातावरती बाई…
पाऊस बरसता बटुव्यांचा झरझरा …
कढईत बटुवे भरले मग भरभरा …
ठेवुनी चुलीवर केली विचारपूस …
साजूक तुपावर परतून ते खरपूस ..
बटुव्यांवर ओतून शुभ्र दुधाची धारा…
घातली मुठीने त्यात चिनी शर्करा …
वेलची कुटूनी त्यात घातली पूड …
तैयार जाहले स्वादिष्ट खीर फूड
उकळून रटरटा दरवळ सुटता छान …
मी जेवाया मम खास घेतले पान …


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.