फेसाळत्या चहाचा जाता भरून प्याला
फेसाळत्या दुधाचा आला कुठून प्याला
खडकावरून धावे वेगे झरा खळाळे प्याला
फेसाळत्या जलाचा घ्यावा पिऊन प्याला
मैत्रीत प्रीत आहे प्रीतीत मैत्र आहे
फेसाळत्या धुक्याचा गेला खिरून प्याला
प्याले न मोजिले मी पेयात नाहले मी
फेसाळत्या नशेचा उरला पुरून प्याला
मम् शब्द जादुई हे बिजली तयांस घुसळे
फेसाळत्या गझलचा येतो वरून प्याला
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २४)
लगावली (गागालगा/लगागा/गागालगा/लगागा/)