तरही गझल
गझलेची पहिली ओळ कवी राज पठाण यांची
साऱ्याच नाटकांचा होणार अंत आहे
कोणी न पोर येथे कोणी न संत आहे
देऊळ भंगलेले वेदीवरी न मूर्ती
तेथे भुजंग ज्याची कीर्ती दिगंत आहे
आत्माच बँक माझी येथे कळ्या सुगंधी
होतात शब्द यांचे संख्या अनंत आहे
वाऱ्यास नाचऱ्या मी हृदयात कोंडल्यावर
हुंकारतो असा तो जैसा सुमंत आहे
मी ना गुलाम झाले कुठल्याच प्राक्तनाची
जिंकेन प्राक्तनाला इच्छा ज्वलंत आहे
संतास सन्त कोणी लिहिले जरी खरे ते
अरिहंत यातला पण हं ना हलन्त आहे
मी घेतलाच कोठे लग्नातही उखाणा
मक्त्यातली सुनेत्रा प्रिय भाग्यवंत आहे