थंडावता बाजार हा
मंदावला व्यापार हा
प्राशून पाणी क्षारमय
झाला कमी आजार हा
टाळूनिया पुनरुक्तिला
आला तिला आकार हा
देताच दगडा रूप मी
झाला सगुण साकार हा
वाटून सारी बंडले
विझला अता अंगार हा
झाला किती कृतकृत्य तो
उच्चारता आभार हा
गेला तसा आला पुन्हा
परतूनिया साभार हा
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/