लौकिकात मज जगावयाचे भाव भावनांसाठी
विनयाने मज झुकावयाचे भाव भावनांसाठी
बालक होउन मी मी करुनी भांड भांडण्यासाठी
अभिमानाने फुलावयाचे भाव भावनांसाठी
सम्यक्त्वाची अंगे अगणित असतिल शास्त्रामध्ये
वात्सल्याने भिजावयाचे भाव भावनांसाठी
कशास संसाराची भीती अन अभिलाषेचीही
चिंब त्यात मज नहावयाचे भाव भावनांसाठी
अभिनय करता करता उतरव मार्दव अंतर्यामी
उतरवुनी मद बुडावयाचे भाव भावनांसाठी
मात्रावृत्त (१६+१२=२८मात्रा)