भीजपावसा अता भिजव मृत्तिका
गावयास सावळी तलम मृत्तिका
मृत्तिकेस बावऱ्या रंग लाव तू
रंगल्यावरी घटास भरव मृत्तिका
दाटल्या नभापरी वस्त्र जांभळे
नेसवून घाटदार घडव मृत्तिका
डौलदार चालते वीज प्राशुनी
वाटते जणू सुरा सजल मृत्तिका
गझल गात शिंपते चांदणे जळी
वाहतेय सुंदरा तरल मृत्तिका
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १९)
लगावली – गालगालगालगा/गालगालगा/