जलौघवेगा सुसाट सुंदर
प्रवाह खळखळ विराट सुंदर
धबाबणारा प्रपात दावी
रुपास अपुल्या अचाट सुंदर
वळून झाले उसवुन झाले
पुन्हा विणूया चऱ्हाट सुंदर
अगीनगाडी रुळावरोनी
मजेत धावे तराट सुंदर
मिरवित आहे हळद नि कुंकू
सतेज मंगल ललाट सुंदर
निशांत झाला खरा सुनेत्रा
नवी गुलाबी पहाट सुंदर
वृत्त – जलौघवेगा, मात्रा १६
लगावली – ल गा ल गा गा/ ल गा ल गा गा