मज मना लाजणे आवडे
पापण्या झुकविणे आवडे
राग तो गिळुनिया अंतरी
अधर तव दाबणे आवडे
कावरी बावरी लोचने
चोरुनी वाचणे आवडे
हृदय तू बंद केले जरी
त्यात मज राहणे आवडे
मी समोरी असोनी तुझ्या
आडुनी पाहणे आवडे
टोमणे मारणे बासना
मज मधुर बोलणे आवडे
दे सुनेत्रा गझल नित नवी
त्यात मज डुंबणे आवडे
वृत्त – गा ल गा/ गा ल गा/ गा ल गा( वीरलक्ष्मी)