कशास रे होडी हवी हात पाय मजबूत
मोठे विक्राळ सागर केले पोहून मी पार
माझ्या हृदयी कंदील ज्योत त्याची तेवणारी
त्याच्या प्रकाशात पीत निळा समुद्र पेलला
सारेगमपधनीसा सूर लागले गगनी
लाल पेटले अंबर घन काळे गोठवूनी
कुठे कुणी कसे कोण काय प्रश्न कुंडलीचे
अश्या कुंडलीचे प्रश्न चुलीलाच भरवले
माझ्या माजी कुंडल्यांची राख खाक झाली आज
राखेचे त्या उटणे मी आज लावते तोंडास
अरे अरे दोषग्या तू किती झालास लाचार
बिछान्यात माय मेली कुठे झालास पसार
घडव तू मूर्त स्वतः उजळण्या अंतरास
तोच आत्मा जिनदेव त्याग मिथ्यात्व भ्रमास