मम सांजेचा रंग केशरी
निळी जांभळी निशा नाचरी
प्रभात ल्याली हळदी शालू
किती देखणी जरी बावरी
सकाळ गोरी मस्त गव्हाळी
विरघळलेली मधुर साखरी
दुपार सोन्यासम झळझळते
संध्या श्यामल दिसे लाजरी
संधिकालची बेला सुंदर
अधरांवरची जणू बासरी
मम सांजेचा रंग केशरी
निळी जांभळी निशा नाचरी
प्रभात ल्याली हळदी शालू
किती देखणी जरी बावरी
सकाळ गोरी मस्त गव्हाळी
विरघळलेली मधुर साखरी
दुपार सोन्यासम झळझळते
संध्या श्यामल दिसे लाजरी
संधिकालची बेला सुंदर
अधरांवरची जणू बासरी