मला आवडे ग लिहायास काही
तिला आवडे ग जपायास काही
कुणी आवडेल तिलाही दिवाना
फुला आवडे ग पहायास काही
रुमालावरी न रुमालात पक्षी
भला आवडे ग भरायास काही
नको ते रितेपण वाट्यास तिचिया
जिला आवडे ग विणायास काही
धुंवाधार श्रावण आषाढ झिमझिम
जला आवडे ग धरायास काही
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १९)
लगावली – लगागा/लगाल/लगागा/लगागा/