तीनही लाजली माकडे
माणसे जाहली माकडे
लाजणे भावले रे मला
लाजता भावली माकडे
वाकुल्या दाविती बालके
जाणुनी नाचली माकडे
तोतये दाबिती जेधवा
तापुनी कावली माकडे
जोंधळा सांडता भूवरी
चांदणे प्यायली माकडे
अंतरी गाजता लाटही
अंबरी पोचली माकडे
तू सुनेत्रांस दो चुंबिता
खेळुनी झोपली माकडे
वृत्त – गा ल गा/गा ल गा/गा ल गा/ (वीरलक्ष्मी)