अविरत माझ्या मनात कविता काव्य आणखी गझल नाचते
अविरत माझ्या मनात वनिता काव्य आणखी गझल नाचते
कृष्णा तापी मिठी सावित्री उधाणताना सळसळताना
अविरत माझ्या मनात सरिता काव्य आणखी गझल नाचते
गंगा झेलम पवना सिंधू नांदायाला निघती जेव्हा
अविरत माझ्या मनात दुहिता काव्य आणखी गझल नाचते
तेजस शशधर भास्कर शीतल दो नेत्रांतुन बघता पृथ्वी
अविरत माझ्या मनात सविता काव्य आणखी गझल नाचते
दीपक पणती निरांजनातिल ज्योत भेटता समईमध्ये
अविरत माझ्या मनात पलिता काव्य आणखी गझल नाचते
जिंकायाला पूर्ण बलेला ब्रम्हांडी पिंडी झळकाया
अविरत माझ्या मनात निकिता काव्य आणखी गझल नाचते
हृदयमंदिरी माळेमध्ये जपण्यासाठी नाम जिनाचे
अविरत माझ्या मनात धरिता काव्य आणखी गझल नाचते
गझल मात्रावृत्त (मात्रा ३२)