मुक्त हस्त चित्र काढ ओतण्यास त्यात जीव
रंगसंगतीस जाण ओतण्यास त्यात जीव
वाचणे पुरे अता दिसावयास स्वप्नचित्र
गोष्ट तूच ऐक सांग ओतण्यास त्यात जीव
गोठ ताप जा ढगात वर्षण्यास शुद्ध नीर
बरस चिंब भिजवण्यास ओतण्यास त्यात जीव
ये इथे रहावयास आसमंत रम्य क्षम्य
बोलुयात खास बात ओतण्यास त्यात जीव
प्रेम प्रीत इश्क बिश्क जा बुडून भावनेत
खोल खोल सूर मार ओतण्यास त्यात जीव
लगावली – गालगाल/गालगाल/गालगाल/गालगाल/