मेघदूत श्याम श्वेत मूक मूक लोचनात
गर्द दाट रान शेत मूक मूक लोचनात
माय ओणवी जलास शिम्पतेय अंगणात
कृष्णरंग पेरलेत मूक मूक लोचनात
सान बालिका खुडे फुले मनात गात गात
मुग्ध भावना सचेत मूक मूक लोचनात
पौर्णिमेस नाचतेय लाट लाट सागरात
शंख शिंपले नि रेत मूक मूक लोचनात
ही हवा ढगाळ कुंद दावतेय आरशास
कैक शब्द दाटलेत मूक मूक लोचनात
अक्षरगणवृत्त – मात्रा २४
लगावली – गाल/गाल/गाल/गाल/गाल/गाल/गाल/गाल/