मोसमी पाऊस यावा चिंब भिजवित
माझिया गावात गावा चिंब भिजवित
भिजविले मज घन घनाने प्रेमरंगी
तो स्वतःही त्यात न्हावा चिंब भिजवित
गझल माझी धुंदलेली नाचणारी
गातसे तिचियात रावा चिंब भिजवित
वीज जेव्हा करितसे सारथ्य मेघी
वाजवी पाऊस पावा चिंब भिजवित
तू अता ये..तू अता ये… पावसारे
“मी” अता करणार धावा चिंब भिजवित
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २१)
लगावली – गालगागा/ ३ वेळा