नकोच आहे? नीघ इथूनी
नाटक काहे! नीघ इथूनी
बघेल कोणी कशास चिंता!!
कुणी न पाहे नीघ इथूनी
ताटामधले म्यागी मोदक
निमूट खा हे नीघ इथूनी
तुझा छबीला प्रियकर बियकर
इथे न राहे नीघ इथूनी
वाऱ्यासंगे जायचेच तर
वारा वाहे नीघ इथूनी
पुरे बनविणे पुतळे बितळे
अता न साहे नीघ इथूनी
हा! हा! ही! ही! लिहिते मी अन
गा~ गा~ गा हे नीघ इथूनी
फणसपेटी अन ववसा घेउन
श्रावण माहे नीघ इथूनी
लहर बहर तू अता सांगते
मला हवा हे नीघ इथूनी
नकोस बोलू उघड नयन तव
धुके पहा हे नीघ इथूनी
बर्फाच्छादित शिखरांना नम
धर्म दहा हे नीघ इथूनी
दोनच जाती सांग मूढ या
नवपन्था हे नीघ इथूनी
उरले सुरले शब्द जपाया
अहा ! अहा ! हे नीघ इथूनी
मोज ‘सुनेत्रा’ गुण स्थानांना
बघ चौदा हे नीघ इथूनी
पुन्हा यावया बारा तेरा
घन सोळा हे नीघ इथूनी
मीच एकटी म्हणते दमते
जा ! जा ! जा हे नीघ इथूनी
दे दे म्हण वा हवे हवे म्हण
अथवा चाहे नीघ इथूनी
सल्लेखानच घे मानाया
द्रव्य सहा हे नीघ इथूनी
प्रभुचरणावर जास्वंदीचे
सुमन वहा हे !!! नीघ इथूनी
गझल – १६ मात्रा