वागणे बेछूट आता
सोडुनी दे सूट आता
सोड काथ्याकूट आता
सेल ठेवुन म्यूट आता
भाजले मी शेंगदाणे
कर तयांचा कूट आता
चक्रव्यूहा भेद बाणा
उलगडाया कूट आता
पांघरोनी घोंगड्याला
नागव्यांना लूट आता
संपले अवतार मिथ्या
तू इथूनी फूट आता
रिक्त जागा भर सुगंधे
भरुन याया तूट आता
गझल – अक्षरगण वृत्त (मात्रा १४)
लगावली – गालगागा/गालगागा/